Home ब्रेकिंग बातम्या कामगार नेते महेंद्र घरत यांनी केला अशोक सराफ यांचा जाहीर सत्कार

कामगार नेते महेंद्र घरत यांनी केला अशोक सराफ यांचा जाहीर सत्कार

0


पनवेल प्रतिनिधी: यमुना सामाजिक
शैक्षणिक संस्था, शेलघर यांच्या सौजन्याने आणि कामगार नेते महेंद्र घरत यांच्या पुढाकारातून उलवे येथे ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री व ‘महाराष्ट्र भूषण’ अशोक सराफ यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर तसेच ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासह विविध राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी उलवे परिसराच्या विकासाच्या आठवणी सांगत अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्राचं हृदय’ म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या. दि. बा. पाटील यांच्यासारख्या नेतृत्वाने निर्माण केलेल्या भूमीवर अशा दिग्गज कलावंताचा सत्कार होणे विशेष असल्याचे सांगत उलवेच्या मातीचा प्रवास माझ्या डोळ्यांसमोर घडलाय. येथील प्रगती ही भूमिपुत्रांच्या संघर्षाची देण असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केल्या.
तर, वनमंत्री गणेश नाईक यांनी महेंद्र घरत यांचे राजकीय आणि सामाजिक समन्वयकत्व कौतुकास्पद असल्याचे सांगत अशोक सराफ यांच्यासह इतर कलाकारांवर असलेल्या प्रेमाचा
उल्लेख केला. त्याच प्रमाणे अशोक सराफ हे अष्टपैल कलाकार असून त्यांच्या मनात सर्व सहकलाकारांविषयी प्रेमा असल्याचे सांगितले. तसेच विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांचा संदभदेत राजकारणातील काही अनुभव त्यांनी विनोदी शैलीत मांडले.
आपल्या सत्काराला उत्तर देताना अशोक सराफ यांनी हा सत्कार माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचे सांगितले, तसेच ‘माझं यश हे रसिक प्रेक्षकांचे प्रेम आहे. मी कुणीच नाही, मला ओळख देणे ही महाराष्ट्राची कृपा आहे,’ असे सांगत त्यांनी निवेदिता ताई आणि प्रेक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here