Home आरोग्यविषयक कस्तुरबा रुग्णालयात रक्त तपासणी नाही , रुग्ण हैराण

कस्तुरबा रुग्णालयात रक्त तपासणी नाही , रुग्ण हैराण

0


केतन खेडेकर
चिंचपोकळी येथील सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे महपालिकेचे रुग्णालय म्हणून ख्याती असलेले साथीच्या आजारचे  कस्तुरबा रुग्णालयात रुग्णांच्या रक्त  तपासण्या होत  नाही. गेल्या पाच ते सहा महिन्यापासून या सर्व रक्त तपासण्या बंद आहेत. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बाहेरील रक्त तपासणी लॅब वर अवलंबून राहावे लागत आहे. तसेच ही बाहेरील रक्त तपासणी लॅब आवाच्या सव्वा दर आकरत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत. कोविड आजाराच्या वेळी संपूर्ण जगात नावलौकिक मिळालेल्या या महापालिकेच्या  कस्तुरबा रुग्णालयाची ही अशी अवस्था झाली आहे. तरी रुग्णालय प्रशासनाने त्वरित आपल्या रुग्णालयातील रक्त चाचणी प्रयोगशाळा सुरू करावी अशी मागणी रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक करत आहेत.
आम्ही रुग्णालय प्रशासनाशी भेट घेऊन याबाबत त्यांना ही परिस्थिति सांगितली असता लवकरात लवकर या ठिकाणी एका नवीन खाजगी रक्त प्रयोगशाळेला नेमणूक केले जाईल आणि रुग्णांची गैरसोय थांबेल अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी विभागअध्यक्ष अनिल येवले यांनी दिली.
महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी  नवीन रक्त चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळेला टेंडर दिले आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल. ही सगळी प्रक्रिया केंद्रीय एजन्सी कडे असून त्यासाठी थोडा विलंब झाला होता परंतु आता ही प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच रुग्णालयातील रक्त प्रयोगशाळा सुरू होईल अशी माहिती कस्तुरबा रुग्णालयाचे अधिष्ठाता चंद्रकांत पवार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here