Home ब्रेकिंग बातम्या नवनिर्वाचित राज्यसभा खासदार राम वडकुते यांचा समाजसेवक के रवी यांनी केला सत्कार   

नवनिर्वाचित राज्यसभा खासदार राम वडकुते यांचा समाजसेवक के रवी यांनी केला सत्कार   

0


केतन खेडेकर                                                                                                                       राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार राम वडकुते यांचा मुंबई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी इंडिया मिडिया लिंकचे संचालक आणि समाजसेवक के रवी यांनी नुकताच सत्कार केला. 
मी अत्यंत गरीब घराण्यातील कार्यकर्ता असून मला कार्यकर्ता आणि समाजसेवेची आवड असल्याकारणाने मी राजकारणामध्ये आलेलो आहे. मला राजकारणामध्ये  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत लोकप्रिय आहेत त्यांनी मला अचानक कॉल केला आणि त्या कॉल आल्यानंतर माझी बिनविरोध राज्यसभेवर खासदार पदी निवड करण्यात आली . आज मी खासदार जरी असलो तरी माझे प्रयत्न गरजांसाठी असेल गरजवंतासाठी असतील जे गरीब नागरिक आहेत त्यांच्यासाठी मी सदैव असेल. तसेच समाजसेवक के रवी  यांनी आज माझा सन्मान सत्कार सोहळा मी राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी करण्यात येतोय तर खूप कौतुक आहे.  की गोरगरिबांचा किंवा कोणालाही काही कधी माझी गरज लागली तर मी नक्की प्रयत्नशील असेल मी त्यांना नक्की मदत करेल आणि अनेक मुद्दे जे आहेत मी ते मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने पालन करून नक्कीच मांडण्याचा प्रयत्न करेन. अशी माहिती नवनिर्वाचित राज्यसभा खासदार राम वडकुते यांनी दिली.


साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी आहे अशा प्रकारे नवनिर्वाचित खासदार राम वडकुते काम करत असतात. समाजातील तळागाळातील लोकांना मदत करणे हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे त्याप्रमाणे जे काम करतात आणि यापुढे देखील ते गरीब समाजासाठीच घरात राहतील असा मला ठाम विश्वास असल्याची माहिती इंडिया मीडिया लिंक इव्हेंट मॅनेजमेंट चे संचालक , समाजसेवक के रवी यांनी दिली.    यावेळेस सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मान्यवर पदाधिकारी आणि अभिनेते दिग्दर्शक निर्माते आणि प्रसारमाध्यमांची प्रमुख उपस्थिती या होती. ऍडव्होकेट शंकर यादव, सुरेश यादव, प्रीतम आठवले, अभिनेता अली खान, अभिनेता कमाल खान यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here