केतन खेडेकर
मराठी माणसांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना त्यांच्या नोकऱ्यांमध्ये मानाचे स्थान मिळवून देणारच असे जाहीर प्रतिपादन स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे अध्यक्ष, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी
सेंट्रल रेल्वे स्थानीय लोकाधिकार सेना स्थापना सोहळा नुकताच महालक्ष्मी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले शिवसेनेमुळे आज मराठी माणूस ताठ मानेने उभा आहे. अनेक सरकारी आणि खाजगी कंपन्यांमध्ये मराठी माणसाला शिवसेनेमुळे मनाचे स्थान मिळाले आहे. शिवसेना नेहमीच कामगारांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहे आणि यापुढेही उभी राहील. आज मी रेल्वे कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी आज रेल्वेमध्ये स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाची स्थापना केली.
स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ हे स्थापना झाल्यापासून अगदी जोशात काम करत आहे. स्थापनेच्या दिवशीच 28 आस्थापनामध्ये आम्ही स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या माध्यमातून शुभारंभ केला. अनेक कामगारांचे प्रश्न आम्ही या एका वर्षातच सोडवले. त्यामुळे मोठ्या संख्येने खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील अनेक कंपन्या या स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाकडे आकर्षित होत आहेत. कामगारांप्रती जाणीव असलेली स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ ही गजानन कीर्तिकर यांच्या लोक मार्गावर विश्वास ठेवून काम करत आहे आणि यापुढेही काम करत राहील असे जाहीर प्रतिपादन स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे सरचिटणीस अरुण मोरे यांनी या कार्यक्रमात केले. यावेळी कार्याध्यक्ष संजय आंग्रे,सरचिटणीस रणजीत खिलारे, कोशाध्यक्ष रितेश बडगुजर,
रुपेश आंबोकर , शंकर भंडारे,अंबुज यादव, सुभाष मळगी उपस्थित होते.
यावेळी सेंट्रल रेल्वे स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यांच्यासह स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Home ब्रेकिंग बातम्या मराठी माणसांना स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ न्याय देणारचमाजी खासदार गजानन कीर्तिकर








