मुंबई प्रतिनिधी
भायखळा पूर्व येथील राणीबागेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम करून ठेवल्यामुळे तसेच लोखंडी प्लेट वर खाली ठेवल्यामुळे या लोखंडी प्लेटमध्ये अडकून अनेक पादुचारी पडत आहेत. तसेच या लोखंडी प्लेटचा अंदाज न आल्याने दुचाकी चालकांचा मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहे. रात्रीच्या वेळी तर ह्या लोखंडी प्लेटमध्ये असल्यामुळे दुचाकी चे पुढचे चाक या लोखंडी प्लेटमध्ये अडकून दुचाकी चालक जबर जखमी होत आहे. तसेच या ठिकाणी हा कंट्रकटर देखील बेफिकीर करत असून या ठिकाणी त्यांनी कोणताही सुरक्षेची उपायोजना केलेली नाही. त्याचा नाहक त्रास या दुचाकी चालकांना तसेच नागरिकांना होत आहे.
सध्या ह्या महामार्गावर अर्धा रस्ता हा डांबराचा असून अर्धा रस्त्यावर लोखंडी प्लेट टाकलेल्या आहे. राणीबागसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून जाताना दुचाकीस्वारांना खड्डय़ांतून जीव सांभाळत दुचाकी चालवावी लागत आहे. या ठिकाणी राणीबाग असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात. त्यांना देखील या लोखंडी प्लेटचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी या ठिकाणी असणाऱ्या लोखंडी प्लेट काढाव्यात आणि हा रस्ता त्वरित दुरुस्ती करावा अशी मागणी स्थानिक रहिवासी, पादचारी, वाहन चालक आणि दुकानदार करत आहेत
ह्या महामार्गावर अर्धा रस्ता हा डांबरीकरणाचा असून अर्धा रस्त्यावर लोखंडी प्लेट टाकलेल्या आहेत. त्यामुळे येथे अपघात करण्याचे अनेक तक्रारी माझ्याकडे आलेले आहेत. याबाबत मी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळविलेले असून हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात येईल आणि येथील टाकलेला लोखंडी प्लेट परत करण्यात येईल अशी माहिती भाजपचे स्थानिक नगरसेवक रोहिदास लोखंडे यांनी दिली.








