मुंबई प्रतिनिधी
घोडपदेव येथील हरुसिंग शोभराज चाळीच्या ट्रांझिस्ट कॅम्प संदर्भ विषयात दि. 17 एप्रिल 2025 रोजी *शिवसेना उपनेते विभाग प्रमुख यशवंत जाधव आणि माजी आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्या प्रयत्नाने म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा म्हाडा उपाध्यक्ष संजीव जैस्वाल आणि मुख्य अधिकारी मिलींद शंभरकर* यांच्या समवेत बांद्रा येथील म्हाडा मुख्य कार्यालयात हरूसिंग शोभराज चाळ धोकादायक परिस्थितीत असून त्याचे त्वरित स्ट्रक्चरल ऑडिट करून ट्रांझिस्ट कॅम्प उपलब्ध करून द्यावा असे आदेश देण्यात आले आहेत. तदनंतर माजी आमदार यामिनी जाधव यांच्या सूचनेवरून लगोलग दुसऱ्या दिवशी शिवसेना भायखळा विधानसभाप्रमुख विजय लिपारे यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्रीमती बने यांच्या दालनात बैठक घेऊन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जैस्वाल यांनी दिलेल्या निर्णयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी भेट घेऊन त्या संदर्भात कार्यवाहीची माहिती घेतली. त्यानुसार त्यांनी पुढील कार्यवाही सुरु केली आहे.
सदर कार्यवाहीसाठी वास्तूविशारद यांची नेमणूकीची प्रक्रिया सुरु केलेली आहे. त्यामुळे नागरिकांना लवकरच ट्रान्झिट कॅम्प उपलब्ध होईल अशी माहिती विधानसभा संघटक विजय लिपारे यांनी दिली. या वेळी रहिवाशी संदेश तांबे आणि ओंकार पवार हे देखील उपस्थित होते.
Home ब्रेकिंग बातम्या घोडपदेव येथील हरुसिंग शोभराज चाळीला ट्रान्झिट कॅम्प उपलब्ध करावा, माजी आमदार यामिनी...








