Home ब्रेकिंग बातम्या लालबाग परळमध्ये अनिल कोकिळ हरून जिंकणारा जनसेवक

लालबाग परळमध्ये अनिल कोकिळ हरून जिंकणारा जनसेवक

0


मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 204 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने किरण तावडे आणि शिंदे सेनेच्या वतीने स्थानिक माजी नगरसेवक अनिल कोकिळ  हे  रिंगणात होते. अनिल कोकिळ याच प्रभागात माजी नगरसेवक होते. परंतु ऐन वेळेला त्यांची उमेदवारी नाकारून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे शाखाप्रमुख किरण तावडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अनिल कोकिळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून त्यांनी याठिकाणी शिंदे सेनेच्या वतीने निवडणूकीत उभे राहून किरण तावडे यांना जाहीर आव्हान दिले. त्यामुळें या ठिकाणी  निवडणूक अटीतटीची झाली. त्यातच लालबाग परळ हे शिवसेनेच्या स्थापनेपासून हा प्रभाग शिवसेनेकडे असल्याने आणि बाळासाहेब लालबाग परळला शिवसेनेचे हृदय म्हणायचे. त्यामुळे निवडणुकीमध्ये येथे कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होतं. कारण थोड्याच दिवसापूर्वी या ठिकाणी राहणारे शिवसेनेचे माजी माजी आमदार दगडू दादा सकपाळ यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत  शिंदे सेनेत प्रवेश केल्यामुळे येथे राजकीय वातावरण बदलले होते. त्याचा फायदा अनिल कोकिळ यांना होणार असे समीकरण होते. त्यातच शिंदे सेनेचे उमेदवार माजी नगरसेवक अनिल कोकिळ यांचा प्रभागात असलेला दांडगा जनसंपर्क आणि त्यांनी प्रभागात केलेल्या कामामुळे त्यांचा विजय पक्का होणार अशी विभागात चर्चा रंगली होती. या प्रभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपच्या नेत्या, आमदार चित्रा वाघ यांनी देखील कोकिळ यांना विजयी करण्यासाठी विशेष लक्ष दिले होते. परंतु लालबाग, परळ हा शिवसेनेचा ठाकरेंचा बालेकिल्ला असल्याने येथे शिवसेनेच्या  खासदार, आमदार यांनी मेळावे घेऊन शिवसैनिक यांना निष्ठेचे धडे दिले. त्यातच दोन्हीं ठाकरे एक झाल्यामुळे येथे मराठी माणसांचे मतदान एकगठ्ठा शिवसेना उबाठा उमेदवार किरण तावडे यांना झाले आणि ते तीन हजार मतांनी निवडून आले. परंतु तावडे जरी निवडून आले तरी खरा विजय हा अनिल कोकिळ यांचाच झाला अशी प्रभागात चर्चा आहे. कारण अनिल कोकिळ यांना प्रभागात मानणारा वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे. कारण त्यांनी रात्री अपरात्री लोकांची वॉटर, मीटर, गटार आणि लोकांना रुग्णालयात ऍडमिट करण्यापासून ते ऑपरेशन पर्यंत सर्व कामे केली आहेत. विभागात आपला हक्काचा माणूस आपण गमावला अशी भावना लोकांची झाली असून  कोकिळ यांचे अभिनंदन करण्यासाठी लोक  पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्या घरी गर्दी करत आहेत. शेवटी माजी नगरसेवक अनिल कोकिळ हे हारून जिंकले अशी चर्चा प्रभागात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here