नंदु घोलप
मुंबई – भारताचे महान विधिवेत्ता, भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे अखंड पुरस्कर्ते आणि जागतिक बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान असलेल्या महामानव,विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे.संघटनेच्या वतीने या वर्षी ही त्यानिमित्ताने नवनीर्माण पत्रकार सेवा संघ (रजि.) तसेच स्वाधीन सामाजिक संस्था (रजि.) यांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.संस्थेच्या वतीने मागील १० वर्षा पासून महामानवाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना चहा, बिस्कीट, व पाणी वाटप सलग दोन दिवस करण्यात येते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीतील कार्याचा गौरव करण्यासाठी संघातर्फे अनेक पत्रकार, संपादक आणि सामाजिक बांधवांनी एकत्र येऊन कार्यक्रमाचे नियोजन केले असून दिवंगत राष्ट्रनेत्याच्या स्मृतीदिनानिमित्त सर्व भिम अनुयायांसाठी मोफत बिस्कीट आणि पाण्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. शहरातील विविध ठिकाणी आंबेडकरी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने भेट देत असल्याने त्यांना सहकार्य करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमात संपादक दिपक आढाव, संपादक निडर सम्राट, मनोज म्हात्रे, कैलासराव पाटील, कमल वर्मा, आनंद श्रीवास्तव, सुरेश मगरे, नितीन मगरे,नंदू घोलप(संपादक दैनिक सम्राट मूकनायक,प्रतिनिधी दैनिक सौजन्य महाराष्ट्र), राज पांडे,अजय भटीजा,सादिक शेख,ताहीर सलमानी दक्ष नागरिक विजय देवकर.विवेक पाईकराव(दांडी), तसेच पत्रकार संघाचे स्टॉल वर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तरुण नेते अनिकेत मनोज भाई संसारे व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चेंबूर चे माजी आमदार प्रकाशभाऊ फातर्फेकर स्थानिक नगरसेविका आशाताई सुभाष मराठे.महादेव शिवगण. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे प्रियांका गिरीश आढाव यांनी भेट दिली व सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला “डॉ. आंबेडकरांनी भारताला दिलेले योगदान अतुलनीय आहे. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर उभी असलेली भारतीय लोकशाही त्यांच्याच चिंतनाचा पाया आहे,” असे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमात नागरिकांना शांतता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात येणार आहे. तसेच युवकांना संविधानिक मूल्ये जपण्याचे आवाहन करण्यात येईल. डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्याची प्रेरणा घेत समाज उन्नतीचा मार्ग बळकट करण्याचा संदेशही यावेळी देण्यात येणार आहे.
Home ब्रेकिंग बातम्या डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवनिर्माण पत्रकार सेवा संघातर्फे बिस्कीट–पाणी वाटप”








