मुंबई प्रतिनिधी
चिंचपोकळी येथील कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौकामध्ये अनेक अपघात होत असल्याकारणाने तेथे कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य स्मृतीस्थळ आणि वाहतूक बेट यांची पुनर्बांधणी ताबडतोब करावी. अशी मागणी कामगार नेते अनिल गणाचार्य यांनी केली. याबाबत त्यांनी चौकातील सर्व नागरिकांची मागणी असल्याकारणाने नुकतीच प्रशांत परदेशी , पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग १, भायखळा पोलीस स्टेशनच्या शेजारी, भायखळा येथे श्री. अनिल गणाचार्य यांनी कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य स्मारक यांचं नाक्यावरती स्मृती स्थळ आणि वाहतूक बेट पुनरबांधणी करण्याबाबतचे निवेदन दिले . याबाबत माझ्याकडे अनेक निवेदन प्राप्त झाले असून तात्काळ पुढच्या आठवड्यामध्ये मी नाक्यावरती भेट देतो. तसेच पुढच्या कारवाईला आपण प्रारंभ करू असे आश्वासन परदेशी साहेबांनी दिले.
Home ब्रेकिंग बातम्या चिंचपोकळी येथील गणाचार्य बेटाची त्वरित पुनर्बांधणी करा,कामगार नेते अनिल गणाचार्य








