मुंबई प्रतिनिधी
आम्ही लोकांसाठी काम करत आलो असून यापुढे देखील काम करत राहणार आहे अशी माहिती नवनिर्वाचित शिवसेना वरळी विधानसभा विभाग प्रमुख दत्ता नरवणकर यांनी वरळी येथे जनसंपर्क कार्यालयात शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात दिली. ते पुढे म्हणाले आता थांबायचं नाही लढत राहायचं आणि येणारे विधानसभा निवडणूक ही शिवसेना जिंकेल तसेच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत वरळीतील सहाही जागेवर शिवसेनेचा भगवा फडकला शिव राहणार नाही. आम्ही 24 तास लोकांचे संपर्क असून तळागाळातील लोकांची कामे करण्यात आमच्या संपूर्ण दिवस जातो. परंतु विरोधी पक्ष कोणतेही काम करत नाही परंतु खोटा प्रचार करण्यात त्यांचा दिवस जातो.
गणेशोत्सवामध्ये देखील आम्ही संपूर्ण तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून त्यांचे समस्या जाणून घेतले काही ठिकाणी आम्हाला स्वतःहून लोकांचे फोन आले त्यादेखील समस्या आम्ही जागेवर जाऊन सोडवल्या. यापुढे देखील आम्ही लोकांसाठी काम करत राहणार असल्याची माहिती शिवसेनेमध्ये विधानसभा समन्वयक प्रशांत दिवस यांनी दिली. या कार्यक्रमात वरळी येथील विविध मान्यवरांनी, संस्थानी, मंडळानी नरवणकर यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला महिला विभागप्रमुख रत्ना महाले, शाखाप्रमुख राजेश पांडे, पूजा चव्हाण आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.








