Home ब्रेकिंग बातम्या गोरेगावात जागतिक योगादिन उत्साहात संपन्न!

गोरेगावात जागतिक योगादिन उत्साहात संपन्न!

0



मुंबई प्रतिनिधी :

योग हा भारताचा प्राचीन व अनमोल वारसा आहे. शरीर, मन व आत्मा यांचा समतोल साधणारी विद्या आता जागतिक स्तरावर मान्यता पावली आहे. याच अवचित्य साधून, अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्ट व विसावा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या विद्यमाने, जागतिक योगा दिन, विसावा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या कार्यालयात, उत्साहात संपन्न झाला.
       अनिर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट च्या संस्थेपिका – अंजली सरकाळे यांनी योग ही केवळ शारीरिक क्रिया नाही, तर जीवनाची एक कला आहे. शरीर, मन व आत्मा यांचे संतुलन साधून आपण अधिक सकारात्मक, आरोग्यपूर्ण आणि समाधानी जीवन जगू शकतो.  व रोजच योगा करा,असे उपास्थिताना मार्गदर्शन केले.
        ज्येष्ठ नागरिकांनी व योगा महिलानी योगाची प्रत्यक्षित व प्रकार सादर करून, मन व शरीर स्वस्त कसे ठेवावे व आपले मानसिक संतुलन आणि आरोग्य या बाबतची माहिती दिली.
          या सोहळ्यास अनिर्वेद च्या उपाध्यक्षा – अश्विनी बोरगावकर, ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्ष – शैलजा बोन्द्रे, सावली परब, अश्विनी नाखरेकर, हळदणकर सर, विजय केसरकर, नंदकुमार खुळे व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       अनिर्वेद ट्रस्ट आज पर्यंत अंध  दिव्यांग यांना विविध उपक्रमातून आर्थिक मदत करीत असते.  अंध दिव्यागं, स्वप्नील कदम यांना धनादेश देऊन आर्थिक सहाय्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here