Home ब्रेकिंग बातम्या स्टील आयातवरील बीआयएस अनिवार्य करण्याबाबत फाम प्रतिनिधीमंडळानी घेतली पीयूष गोयल यांची भेट


स्टील आयातवरील बीआयएस अनिवार्य करण्याबाबत फाम प्रतिनिधीमंडळानी घेतली पीयूष गोयल यांची भेट

0


मुंबई प्रतिनिधी
फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) चे अध्यक्ष श्री. जितेंद्र शाह यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळाने आज भारत सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री माननीय श्री. पीयूष गोयल यांची भेट घेतली. स्टील मंत्रालयाने अलीकडेच स्टीलच्या कच्च्या मालाच्या आयातीवर बीआयएस प्रमाणपत्र सक्तीचे केल्याच्या निर्णयाबाबत त्वरित हस्तक्षेप करण्याची विनंती यावेळी करण्यात आली.

प्रतिनिधीमंडळाने तीन दिवसांची दिलेली मुदत ही व्यवहार्य नाही, असे सांगून, मिल्सना आवश्यक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पर्याप्त वेळ मिळावा अशी मागणी केली.

यावर माननीय गोयल यांनी तत्काळ स्टील सचिव श्री. संदीप पोंडरिक यांच्याशी चर्चा केली आणि स्पष्टपणे सांगितले की तीन दिवसांची मुदत अपुरी आहे. त्यांनी निर्देश दिले की मिल्सना बीआयएस प्रमाणनासाठी आवश्यक कालावधी द्यावा.

श्री. गोयल यांनी यावेळी असेही सांगितले की भारताने मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या दिशेने टप्प्याटप्प्याने वाटचाल करावी आणि स्टील आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे.

फामच्या प्रतिनिधीमंडळात समिती सदस्य श्री. चिराग दोशी, श्री. जितेंद्र संघवी, श्री. सुमित जैन, श्री. जयेश मेहता आणि श्री. राजा शाह यांचा समावेश होता.

फामला आशा आहे की सरकार लवकरच उद्योग क्षेत्राच्या चिंतेची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेईल आणि वेळेत वाढ जाहीर केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here