समाजसेवक विनोद नारायण विचारे यांना आज दादर येथे स्वराज्य प्रतिष्ठान आणि हुतात्मा बाबू गणेश कुमार समितीच्या वतीने महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्काराचे प्रदान करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत इतर मान्यवर मंडळी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी प्रमोद आप्पा पाटील सुरज भोईर उपस्थित होते. विचारे यांना विविध क्षेत्रात अनेक उल्लेखनीय पुरस्कार मिळालेले आहेत. विचारे यांचे समाजकार्य फार प्रचंड असून त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत आपला जनसंपर्क पोहोचवला आहे. तसेच तळागाळातील लोकांना मदत करण्याचे त्यांचा हातखंडा आहे. त्याच्याच कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिल्याचं सांगितलं जातं.








