मुंबई प्रतिनिधी
आमच्या मिडिया लिंक संस्थेच्या वतीने आम्ही माध्यम प्रतिनिधींच्या माध्यमातून देशाचे लक्ष एका अत्यंत संवेदनशील विषयाकडे वेधू इच्छितो.
सध्या परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत संपूर्ण देश चिंतेत आहे. आम्हाला विश्वास आहे की भारत सरकार या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. तरीदेखील आमच्या NGO तर्फे सरकारला विनम्र पण ठाम विनंती करण्यात येते की तिकडे असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाची सुरक्षितता सुनिश्चित करून त्यांना तातडीने, सन्मानपूर्वक व सुरक्षित पद्धतीने स्वदेशी परत आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात.
याचबरोबर आम्ही सर्व विरोधी पक्ष, सामाजिक संस्था व देशातील प्रत्येक नागरिक यांना आवाहन करतो की हा विषय राजकारणाचा नसून राष्ट्रहिताचा आहे. त्यामुळे सर्वांनी एकदिलाने सरकारच्या प्रयत्नांना भक्कम पाठिंबा द्यावा.
ही आमची कळकळीची आणि जबाबदारीची भूमिका आम्ही आज माध्यमांपुढे मांडत आहोत.
परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा हा राष्ट्रहिताचा विषय आहे, राजकारणाचा नाही.
आम्हाला भारत सरकार वर पूर्ण विश्वास आहे; मात्र परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने ठोस उपाययोजना व्हाव्यात.
प्रत्येक भारतीय नागरिक सुरक्षित, सन्मानपूर्वक व शक्य तितक्या लवकर स्वदेशी परत यावा, ही आमची ठाम मागणी आहे.
आवश्यक असल्यास विशेष बचाव मोहीम, विमान सेवा व दूतावास पातळीवरील समन्वय अधिक बळकट करावा.
सर्व विरोधी पक्ष, सामाजिक संघटना व नागरिकांनी या विषयावर राजकारण न करता सरकारला सहकार्य करावे.
माध्यमांनी जबाबदार भूमिका घेऊन सत्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी व अफवा रोखण्यात मदत करावी.
आमची संस्था सरकारला आवश्यक ते सहकार्य, माहिती व समन्वय देण्यासाठी तत्पर आहे.
“भारतीय कुठेही असला तरी तो देशाचा आहे – त्याच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण राष्ट्र एकत्र उभे राहिले पाहिजे अशी माहिती मिडिया लिंक संस्थेचे अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार के रवी दादा यांनी दिली.








