मुंबई प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली बस सेवा क्रमांक 215 ही नगरसेवक मोहम्मद इब्राहिम कुरेशी यांच्या मेहनतीमुळे पुन्हा सुरू करण्यात आली.
श्रीमती वर्षा ताई गायकवाड जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक मोहम्मद इब्राहिम कुरेशी यांच्या अथक प्रयत्नांमुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली बस सेवा क्रमांक 215 पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
ही बस सेवा आता टाटा कॉलनीपर्यंत सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि भारत नगर, टाटा कॉलनी आणि आसपासच्या भागातील दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
नगरसेवक मोहम्मद कुरेशी यांनी बस क्रमांक 215 ची वातानुकूलित बस सेवा पुन्हा सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यासाठी त्यांनी बेस्ट प्रशासनासोबत अनेक वेळा पत्र व्यवहार केला परिणामी अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या.
लोकांची सोय आणि परिसराचा विकास हे आमचे प्राधान्य आहे. नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले आणि शेवटी बससेवा पुन्हा सुरू होऊ शकली.
या महत्त्वाच्या कामासाठी बीएमसी आणि बेस्ट प्रशासनाचे मी आभार मानतो.
“जनतेच्या समस्या ही आमची जबाबदारी आहे आणि लोकांच्या सोयीसाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. अशी माहिती नगरसेवक मोहम्मद इब्राहिम कुरेशी यांनी दिली.
Home ब्रेकिंग बातम्या दोन वर्षांपासून बंद असलेली बस सेवा पुन्हा सुरू, नगरसेवक मोहम्मद इब्राहिम कुरेशी...








