Home ब्रेकिंग बातम्या सिन्दुर ब्रीज येथील दुभाजकाची शिवसेनेने केली पाहणी

सिन्दुर ब्रीज येथील दुभाजकाची शिवसेनेने केली पाहणी

0


मुंबई प्रतिनिधी
मशीद बंदर येथील सिंदूर ब्रिजचे लोकार्पण नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु या ब्रीज मध्ये नंतर घातलेल्या डीव्हायडर मुळे स्थानिक रहिवाशांना खूप त्रास होत आहे. येथील स्थानिक रहिवाशांना हा ब्रिज ओलांडताना फार मोठा वळसा घालून जाव लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांना आणि वयोवृद्ध नागरिकांना हे दुभाजक ओलांडताना फार मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही तारेवरची कसरत करताना डिव्हायडरमुळे गाड्यांचा अंदाज न आल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. शाळकरी मुलांना शाळेत जाताना हा ब्रिज ओलांडून वळसा घालून जावे लागत असल्यामुळे त्यांना देखील शाळेत जाताना रोजच उशीर होत आहे. तरी येथील डिव्हायडर त्वरित हटवावी अशी मागणी स्थानिक रहिवासी, दुकानदार आणि पादचारी करत आहेत. या डिव्हायडर बाबत अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार आम्ही आज या ठिकाणी शासनाचे अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला असून याबाबत अनेक प्रकारचे सूचना आम्ही मुंबई महानगरपालिकेकडे केलेले आहेत त्या सूचनामुळे लवकरात निराकरण करण्यात येईल अशी माहिती शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा आणि दक्षिण मुंबई विभाग संघटक विजय वाडकर यांनी दिली.
या पाहणी दौऱ्यामध्ये शिवसेना उपनेते सुनील नरसाळे, दक्षिण मुंबई शिवसेना समन्वयक प्रमोद मांजरेकर, कुलाबा विभाग प्रमुख गणेश सानप, मुंबादेवी विभाग प्रमुख रुपेश पाटील आणि इतर शिवसैनिक आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here