मुंबई प्रतिनिधी
एचडीएफसी म्युच्युअल फंडातर्फे आज ‘नारी निवेश यात्रा’ या देशव्यापी गुंतवणूकदार शिक्षण आणि जनजागृती उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून माहितीपूर्ण गुंतवणूक आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या आर्थिक भवितव्याची सूत्रे स्वतःच्या हाती घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने तो राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मुंबईतील वांद्रे येथील चेतना महाविद्यालयातून करण्यात आला.
घरगुती आर्थिक निर्णयप्रक्रिया आणि संपत्ती निर्मितीमध्ये महिलांची वाढती आणि महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेऊन, ‘नारी निवेश यात्रा’चा उद्देश देशभरातील विविध समुदायांपर्यंत गुंतवणूकदार शिक्षण थेट पोहोचविणे हा आहे. यासाठी सहा महिन्यांचा व्यापक जनसंपर्क कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत दोन जनजागृती वाहने भारताच्या दोन वेगवेगळ्या दिशांनी प्रवास करणार असून अनेक शहरे आणि गावांना भेट देतील. प्रत्येक ठिकाणी एचडीएफसी म्युच्युअल फंडातर्फे विविध ठिकाणी सामुदायिक सहभाग उपक्रम आयोजित केले जातील. यामध्ये नुक्कड नाटक (पथनाट्ये) तसेच परस्परसंवादी गुंतवणूकदार जागरूकता सत्रांचा समावेश असेल. या माध्यमातून महत्त्वाच्या आर्थिक संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या जातील आणि गुंतवणुकीविषयी संवादाला चालना दिली जाईल.
या यात्रेचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणजे तळागाळातील महिलांशी थेट संवाद साधणे. या मोहिमेदरम्यान एचडीएफसी म्युच्युअल फंड देशभरातील महिला स्वयं-सहाय्यता गटांबरोबर 60 विशेष सत्रांचे आयोजन करणार आहे. या सत्रांमधून आर्थिक नियोजन, उद्दिष्टाधारित गुंतवणूक, दीर्घकालीन संपत्ती निर्मिती तसेच शिस्तबद्ध गुंतवणूक सवयी विकसित करण्याचे महत्त्व यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल.
या उपक्रमाच्या सादरीकरणाबाबत भाष्य करताना एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नवनीत मुनोत म्हणाले, “भारतामध्ये महिलांना अनेकदा कुटुंबातील सर्वात शिस्तबद्ध बचतदार म्हणून ओळखले जाते. मात्र, वैयक्तिक आर्थिक नियोजनाविषयी योग्य संवाद न झाल्यामुळे अनेक महिलांपर्यंत सुसूत्र गुंतवणुकीची संकल्पना पोहोचलेली नाही. ‘नारी निवेश यात्रा’ ही अशाच संवादाभोवती उभारलेली आहे. पथनाट्ये, सामुदायिक सत्रे आणि स्वयं-सहाय्यता गटांशी थेट संवाद यांच्या माध्यमातून आम्हाला हा संवाद थेट महिलांपर्यंत पोहोचवायचा आहे. गुंतवणूक ही काही गुंतागुंतीची किंवा दूरवरची नसून प्रत्येकाला अगदी सहजपणे करता येईल.
Home ब्रेकिंग बातम्या महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणि गुंतवणुक जागरूकता वाढविण्यासाठी एचडीएफसी म्युच्युअल फंडातर्फे ‘नारी निवेश...








