मुंबई प्रतिनिधी
सिने दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळी चालवणारा आरोपीची ओळख मुंबई पोलिसांना पटलेली आहे. स्कुटी घेऊन आलेले आरोपीने केलेल्या गोळीबार मध्ये आरोपी मुंबई पोलिसांनी ट्रेस केलेला आहे. याच्यामध्ये एकूण बारा आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहेत. यामध्ये बिश्नोई गँगचे नाव आले असून शुभम लोणकर हा सर्व घटना ऑपरेटिव करत होता. त्याच्या भावाला अटक केली असून शुभम लोणकरलाही लवकरच परदेशातून अटक करण्यात येईल. या प्रकरणांमध्ये केंद्र सरकारने एनआयएच्या माध्यमातून अनमोल बिश्नोईला अटक केलेली आहे. सध्या हा अनमोल विष्णू ही येणारी कस्टडीमध्ये असून लवकरच आपण त्याची कस्टडी मागितली असून आपल्या पोलिसांना कस्टडी मिळेल. हा शुभम लोणकर जो आहे तो परदेशात बसून मोठमोठे लोकांना टार्गेट करतो हल्लीच त्यांनी काँग्रेसच्या आमदाराला टार्गेट केलं होतं त्यानंतर त्यांनी भाजपच्या आमदाराला टार्गेट केलं होतं. परंतु त्यांचा कोणताही प्रयत्न आज पर्यंत यशस्वी झालेला नाही. अशा परिस्थितीत सिने अभिनेते, अभिनेत्री किंवा अनेक सेलिब्रिटी घाबरतात परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचे घाबरायचं कारण नाही त्यांना सर्व सुरक्षा यंत्रणा पोलीस पुरवतील हे मी सभागृहाला अस्वस्थ करतो. कोणत्याही परिस्थितीत आम्ही मुंबईला गॅंगवॉर कडे जाऊ देणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर देताना दिली. या उत्तरावर आमदार मिलिंद नार्वेकर यांनी समाधान व्यक्त केले असून मी पोलीस यंत्रणेसोबत, पोलीस कमिशनर देवेन भारती आणि सिने दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितले.
Home ब्रेकिंग बातम्या सिने दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना कधी पकडणार, आमदार...








