Home ब्रेकिंग बातम्या गोराई येथील दूषित पाण्यामुळे नागरिक हैराण, माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांनी दिली...

गोराई येथील दूषित पाण्यामुळे नागरिक हैराण, माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांनी दिली पाहणी

0


मुंबई प्रतिनिधी
गोराई, बोरिवली येथील RSC 31, 37, 39, 40, 41, 44, 46 या परिसरात नागरिकांनी पिण्याच्या नळांमधून मलमिश्रित दूषित पाणी येत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे अनेक तक्रारी करूनदेखील ही समस्या सुटत नसल्याने नागरिकांनी माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांच्या कडे तक्रार केली. त्यानंतर शिवा शेट्टी यांनी त्वरित जलविभागाचे अधिकारी आणि मलनिस्सारण विभागाचे अधिकारी यांच्याशी तात्काळ संपर्क साधून सर्व ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन समस्या सोडवली.

पाहणी दरम्यान निदर्शनास आले की, परिसरातील मलनिस्सारण चेंबरमध्ये रस्त्याचे नुतनीकरण चालू असताना अंदाजे 2 फूट खोलीपर्यंत रस्त्याचे मटेरियल आत गेल्यामुळे सर्व वहिन्या ब्लॉक झाल्या आहेत. यामुळे मलमिश्रित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळून नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. लवकरच त्या ठिकाणी विशेष ‘पाइपलाइन इन्स्पेक्शन कॅमेऱ्याच्या’ साहाय्याने तपासणी करण्यात येणार असून अडथळा नेमका कुठे आहे हे स्पष्ट केले जाईल. महानगरपालिकेच्या संबंधित विभागांशी समन्वय साधून ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांना लवकरच चांगल्या दर्जाचे पिण्याचे पाणी ऊपलब्ध होईल अशी माहिती माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here