Home ब्रेकिंग बातम्या मुंबईतील गोवंडी, मानखुर्दसह दाट वस्त्यांमधील नवजात बालकांची होणारी विक्री सरकार कधी रोखणार,...

मुंबईतील गोवंडी, मानखुर्दसह दाट वस्त्यांमधील नवजात बालकांची होणारी विक्री सरकार कधी रोखणार, आमदार मिलिंद नार्वेकर यांची अधिवेशनात मागणी

0


मुंबई प्रतिनिधी
मुंबईत दाट लोक वस्ती असणाऱ्या भागांमध्ये विशेषतः मानखुर्द गोवंडीमध्ये नवजात बालकांची विक्री करणारे टोळ्या कार्यरत असून या टोळ्या या सरकारी रुग्णालयामधील नवजात शिशूंची विक्री करतात. तसेच या टोळ्यांना नवजात शिशु ची माहिती तेथीलच रुग्णालयातील कर्मचारी देतात. अशा गैरप्रवृत्त कृत्य करणाऱ्या टोळ्यावरती सरकार कारवाई करणार का असा प्रश्न आमदार म्हणून नार्वेकर यांनी विधान परिषदेमध्ये विचारला. त्यावर सरकारी रुग्णालयामधील नवजात शिशूंची विक्री करणारे टोळ्या आहेत. या टोळ्यांना या रुग्णालयामधील नवजात शिशूंची नोंदणी करणारे कर्मचारी त्यांना ही माहिती पुरवत असल्याची माहिती देखील आमच्याकडे आलेली आहे. रुग्णालयामधील नवजात शिशूंची  गोपनीयता ही अखंड राहिली पाहिजे. तसेच आय वी एफ करण्यासाठी येणाऱ्या डोनरची देखील गोपनीयता राहिली पाहिजे. यासाठी आम्ही रुग्णालयामध्ये आवश्यक  असणारी सिक्युरिटी तैनात करू. तसेच आवश्यकता भासल्यास त्या ठिकाणी आम्ही सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून पोर्टल देखील तयार करू. तसेच नवजात शिशूंची विक्री करणारी टोळी आणि त्यांचा कुटुंबातील सदस्यांचा थेट संबंध असेल तर त्या कुटुंबातिल सदस्यांवर देखील गृह विभाग कारवाई करेल अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here