Home ब्रेकिंग बातम्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे एकमेव माध्यम, शिवसेना प्रवक्त्या सुशीबेन शहा

लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे एकमेव माध्यम, शिवसेना प्रवक्त्या सुशीबेन शहा

0


केतन खेडेकर
सध्या या इंटरनेटच्या युगात सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचे सोशल मीडिया हे एकमेव माध्यम असून सध्या सोशल मीडियाला फार मोठ्या प्रमाणात ट्रेंड आहे असे जाहीर प्रतिपादन शिवसेनेच्या प्रवक्त्या सुशिबेन शहा यांनी वाळकेश्वर येथे आयोजित केलेल्या सोशल मीडिया आणि जग या कार्यक्रमात केले. त्यापुढे म्हणाल्या सध्या सोशल मीडिया हे एक नवीन युग आलेले आहे. सध्या माणूस सकाळी उठल्यावर या इंटरनेट पासून ते रात्री झोपेपर्यंत इंटरनेटवर अवलंबून असतो. आजकाल बातम्या बघताना देखील लोक मोबाईल वरील इंटरनेट वापरून सर्व युट्युब फेसबुक सोशल मीडिया आणि वर्तमानपत्र देखील या इंटरनेटवर वाचत असतात. या इंटरनेटचा वापर सर्वसामान्य नागरिकांना कसा व्हावा आणि त्यांना सर्व गोष्टी कशाच एकाच मोबाईल वरती उपलब्ध होतील यासाठीच आम्ही हे सोशल मीडिया आणि त्याचा वापर कसा करावा यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला नागरिकांचा आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मोठ्या  प्रमाणात प्रतिसाद मिळाला. हे एक सुरुवात असून यापुढे देखील मोठ्या प्रमाणात अशा शिबिराचे आयोजन करण्यात असल्याची माहिती शिवसेनेचे प्रमुख शहा यांनी दिली. या कार्यक्रमात शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना आंबोले,  महिला विभाग प्रमुख नीलम पवार, समीक्षा पोफळे, सुधांशू भट, रेखा सुरणकर आणि इतर शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here