Home ब्रेकिंग बातम्या बोरीवली जैन मंदिराच्या विश्वस्त धर्मानुरागी जिनमती शहा यांचे निधन ; ९७ व्या...

बोरीवली जैन मंदिराच्या विश्वस्त धर्मानुरागी जिनमती शहा यांचे निधन ; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*

0



मुंबई प्रतिनिधी : बोरीवली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पोदनपूरा या जैन मंदिराच्या संस्थापक विश्वस्त, बारामतीतील प्रसिध्द श्रीमान शेठ चंदुकाका सराफ यांची कन्या, फलटणचे धनाढ्य व्यापारी व जैन समाजाचे आधारस्तंभ चंदुलाल शहा यांच्या पत्नी  धर्मानुरागी श्रीमती जिनमती शहा यांचे काल प्रभादेवी येथील त्यांच्या निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, स्नुषा, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

जिनमती यांच्या पार्थिवावर दादर, छत्रपती शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. यावेळी प्रभादेवी, वरळी, महालक्ष्मी, ब्रिच कॅण्डी, ताडदेव परिसरातील उद्योजक, साहित्यिक, व्यापारी आदि प्रतिष्ठित उच्चभ्रू नागरिक उपस्थित होते.

जिनमती यांचे पुढील बेस्ना, उठामणा आदि तत्सम कार्यक्रम होणार नाहीत. त्या बारामतीतील प्रसिध्द श्रीमान शेठ चंदुकाका सराफ यांची कन्या, शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका बीनाताई शहा यांच्या मातोश्री तसेच फलटणचे धनाढ्य व्यापारी व जैन समाजाचे आधारस्तंभ चंदुलाल शहा यांच्या त्या पत्नी होत. मुंबईतून प्रसिद्ध  होणारी अनेक दैनिक, साप्ताहिके व पाक्षिके त्यांच्या वरळीतील मुद्रणालयात छपाई केली जात असत. बोरीवली, संजय गांधी उद्यानातील पोदनपूरा या जैन मंदिराचे ते संस्थापक विश्वस्त होते. त्यांनी काही एकर जमीन मंदिरास दान केली आहे.
                  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here