Home ब्रेकिंग बातम्या शिवसेना वरळीच्या महिला शाखाप्रमुख पुजा बारीया यांची खासदार नरेश म्हस्के यांनी केईएम...

शिवसेना वरळीच्या महिला शाखाप्रमुख पुजा बारीया यांची खासदार नरेश म्हस्के यांनी केईएम रुग्णालयात घेतली भेट

0



मुंबई प्रतिनिधी —
वरळीतील शिवसेना शाखा क्र. १९८ च्या महिला शाखाप्रमुख पुजा बारीया यांच्यावर काल उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या धक्काबुक्की आणि मारहाणीच्या घटनेनंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर आज शिवसेनेचे खासदार मा. नरेश म्हस्के आणि पक्षाचे सचिव राम रेपाळे यांनी केईएम रुग्णालयात जाऊन पुजा बारीया यांची भेट घेउन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

खा. नरेश म्हस्के यांनी पुजा बारीया यांना धीर देत सांगितले की, “संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. अशा हल्ल्यांना घाबरण्याचे कारण नाही. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होईल, याबाबत आपण पोलीस प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहोत.”

या भेटीदरम्यान वरळी विधानसभा प्रमुख व मा नगरसेवक दत्ता नरवणकर, ठाण्याचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी, शिवडी विधानसभा समन्वयक कुणाल प्रभूणे तसेच स्थानिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here