Home ब्रेकिंग बातम्या पर्यावरण कार्यकर्ते खरमाळे दाम्पत्यास**ग्रीन सोल्युशन्सतर्फे जीवनगौरव पुरस्कार*

पर्यावरण कार्यकर्ते खरमाळे दाम्पत्यास*
*ग्रीन सोल्युशन्सतर्फे जीवनगौरव पुरस्कार*

0


– १३ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन; शरद तांदळे यांची प्रमुख उपस्थिती

पुणे: प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात सेवा पुरवणाऱ्या देशातील अग्रणी ग्रीन सोल्युशन्स संस्थेच्या १३ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. उद्या शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी ५.३० वाजता रागा पॅलेस, काळेवाडी पुणे येथे आयोजित या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक व उद्योजक शरद तांदळे उपस्थित राहणार आहेत. सीओईपी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप मेश्राम, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश राऊत यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या कार्य्रक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त सहसंचालक डॉ. विद्यानंद मोटघरे यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव करण्यात येणार आहे. तसेच वृक्षसंवर्धन व पर्यावरण सरंक्षण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, वॉटरमॅन व माजी सैनिक रमेश खरमाळे व स्वाती खरमाळे या दाम्पत्यास जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

ग्रीन सोल्युशन्स संस्थेने गेल्या १३ वर्षांत देशविदेशातील १००० पेक्षा जास्त उद्योगांमधे प्रदूषण नियंत्रण यंत्रणा उभारली आहे. संस्थेमार्फत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विषयक अनुज्ञप्ती, पर्यावरण विषयक अनुज्ञप्ती व संलग्न सेवा दिल्या जातात. ग्रीनेक्स एनव्हायरंमेंटलमार्फत उद्योजकांना लाईफ सायकल असेसमेंट, एनव्हायरंमेंटल प्रॉडक्ट डिक्लरेशन (इपीडी), कार्बन क्रेडिट, नेट झीरो इत्यादी सेवा पुरविण्यात येतात, असे ग्रीन सोल्युशन्सचे संस्थापक सागर अहिवळे आणि आरती अहिवळे-भोसले यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here