Home ब्रेकिंग बातम्या शिवसेना अपंग सहाय्य सेनेने केले अंधशाळेत शालेय साहित्याचे वितरण

शिवसेना अपंग सहाय्य सेनेने केले अंधशाळेत शालेय साहित्याचे वितरण

0


*मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना अपंग सहाय्य सेनेच्या वतीने एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. दादर पूर्व येथील कमला मेहता अंधशाळा येथे शाळेतील सर्व मुलींना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.*

*या उपक्रमाचे आयोजन शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष श्री. सूर्यकांत लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दादर-माहीम विधानसभेचे आमदार विभागप्रमुख महेश सावंत, उपविभाग प्रमुख यशवंत विचले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.*

*हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांच्या प्रेरणेने  कार्यरत असलेल्या या शिवसेना अपंग सहाय्य सेनेमार्फत दरवर्षी अंध व अपंग बांधवांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात येते. यंदाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम समाजाप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे प्रतीक ठरला.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here