मुंबई प्रतिनिधी
एलआयसी पुरस्कृत आणि साई सावली सहकारी संस्था आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेला घोडपदेव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात रंगलेल्या क्रिकेट सामन्यांनंतर विजेत्या संघांना व खेळाडूंना मनसे सरचिटणीस संजय नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यांच्या हस्ते ट्रॉफी व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली.
तसेच महिला सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण कार्यक्रमाला भव्यतेची जोड मिळाली.
“मेघगर्जना 2026” हा केवळ क्रीडा सोहळा नसून समाजातील एकता, प्रेरणा आणि महिलांच्या सन्मानाचा एक आदर्श उपक्रम ठरला. आम्ही समाजात महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. तसेच एक भाग म्हणून आम्ही महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आणि त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यापुढे देखील आम्ही महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी महेश दादा थोरात यांनी दिली.








