Home ब्रेकिंग बातम्या लालबागच्या राजाच्या मंडपात सोनू भैयाची दादागिरी

लालबागच्या राजाच्या मंडपात सोनू भैयाची दादागिरी

0


मुंबई प्रतिनिधी
लालबागच्या राजाचे फोटो सेशन नुकतेच पार पडले. परंतु या फोटोसेशन मध्ये एक भयानक प्रकार पाहायला मिळाला. या फोटो सेशन कव्हर करण्यासाठी विविध माध्यम प्रतिनिधी या ठिकाणी आले होते. यामध्ये अनेक माध्यम प्रतिनिधी टीव्ही चॅनेल चे आणि प्रिंट मीडियाचे होते. त्यामध्ये अनेक महिला प्रतिनिधी देखील होत्या. हा फोटो सेशनचा कार्यक्रम चालू होताच मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आली. यावेळेस येथील मंडळाचे पदाधिकारी सोनू दुबे नावाच्या भैय्या पदाधिकाऱ्यांनी महिला माध्यमांच्या प्रतिनिधींशी धक्काबुक्की केली. हा प्रकार अत्यंत लज्जास्पद आणि अपमान कारक असल्याने अनेक माध्यमातील महिला प्रतिनिधींनी आपला निषेध नोंदवला आहे. याबाबत लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांची प्रतिमा मलिन होत आहे.
लालबागच्या राजाचे फोटो सेशन करण्यासाठी मीडियाला आमंत्रण दिले जाते. हे आमंत्रण ऑफिसमध्ये आल्यावर आम्हा महिला प्रतिनिधींना या ठिकाणी हे फोटो सेशन कव्हर करण्यासाठी पाठवले जाते. जर आम्हाला योग्य मान सन्मान आणि सुरक्षा मिळत नसेल तर आम्हाला बोलताच कशाला. याबाबत आम्ही आमची नाराजी आणि दिलगिरी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि मानद सचिव सुधीर साळवी यांना कळवली असून यावर ते काय ॲक्शन घेतात हे आता आम्हाला पहायचे आहे अशी माहिती या फोटोसेशनला आलेल्या महिला माध्यम प्रतिनिधींनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here