मुंबई प्रतिनिधी
ज्येष्ठ कलावंत तमाशा सम्राट काळू-बाळू उर्फ कै. लहू-अंकुश खाडे कवलापूरकर यांचे सांगली येथील विष्णूदास भावे नाट्य मंदिरात तैलचित्र लावण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानभवनात दिले.
तमाशा आणि लोककला क्षेत्रात काळू-बाळू यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककला क्षेत्राच्या सेवेत समर्पित केले. त्यांच्या या योगदानासाठी त्यांना १९९९-२००० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने संयुक्तपणे सन्मानित करण्यात आले होते. मात्र, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या विष्णूदास भावे नाट्यगृहात त्यांचे तैलचित्र अद्याप लावले नसल्याने लोककलावंत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती.
यासंदर्भात जेष्ठ पत्रकार आणि लोककला अभ्यासका गज गायकवाड यांनी सोमवारी विधानभवनात मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, ज्येष्ठ पत्रकार जोसंग बोपेगावकर, नचिकेत पानसरे, केतन खेडेकर उपस्थित होते.
م
دحمد
Home ब्रेकिंग बातम्या ज्येष्ठ कलावंत काळू बाळू यांचे तैलचित्र सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात लावणारपालकमंत्री...








