Home ब्रेकिंग बातम्या अमोल काजरोळकर यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

अमोल काजरोळकर यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0

विद्यार्थ्यांना ध्यानाच्या माध्यमातून एकाग्रता वाढवणे, स्मरणशक्ती सुधारणा तसेच मोबाईलचा अतिरेक सोशल मीडिया, टेलिव्हिजनमुळे एकाग्रता भंग होणे, मानसिक आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी व ताण-तणाव नियंत्रण याबाबत ध्यानधारणा क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक व सर्च विदिन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.अमोल काजरोळकर यांनी मार्गदर्शन केले.

लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त श्री.प्रवीण काजरोळकर व विश्वस्त श्रीमती लता परब, श्री कैलास रेडीज यांच्या पुढाकाराने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, परळी, वाडा, जिल्हा–पालघर येथे विद्यार्थ्यांसाठी दि. ३० व ३१ जानेवारी तसेच १ फेब्रुवारी २०२६ रोजी तीन दिवसीय ध्यान (मेडिटेशन) शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात
सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. विलास बंजारा यांनी सर्च विदिन फाउंडेशनचे कोकण विभाग समन्वयक श्री. संजय हुंबरे,तसेच शाळेतील शिक्षकवर्ग व इतर कर्मचारी यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here